Books

सो कुल...

एक अभिनेत्री असल्यामुळे मी कायम दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्यं पाठ करत असते. त्यामुळे मनातले अनेक विचार आणि भावना स्वतःतच राहून जातात. माध्यमांमध्ये प्रत्येक घटनेवर मत विचारण्याच्या वाढत्या प्रवाहात सहभागी होताना लवकरच जाणवलं, की उत्तरांपेक्षा ‘बाइट’ महत्त्वाचा असतो; पण विचार मात्र मनात सुरूच राहतात. त्या विचारांना शब्द देण्याची गरज वाटली आणि त्यातून या लेखनाचा जन्म झाला. हा संवाद इतरांशी नव्हता, तर स्वतःशी होता. पुणे, मुंबई, अभिनय, प्रवास आणि आयुष्यात भेटलेली माणसं यांनी माझी जडणघडण घडवली; त्यामुळे या लेखांमध्ये माझ्या जगण्याचे आणि अभिनयविश्वाचे संदर्भ सहजपणे आले आहेत.

Publication Year : 2009

Pages : 240

Language : Marathi

Publisher : Rajhans Prakashan

Buy Now On : 

सो कुल... टेक २

‘सो कुल… टेक २’ हे शीर्षक आल्हाद गोडबोलेंना सुचलं आणि मला ते पहिल्याच क्षणी आवडलं. पहिल्या टेकनंतर येणाऱ्या दुसऱ्या टेकमध्ये जशी अधिक सहजता, अनुभव आणि लय असते, तसाच हा प्रवास. २०१० मध्ये ‘सो कुल…’ प्रकाशित झाल्यानंतर २०११ ते २०१४ या काळात ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा’ पुरवणीत पुन्हा दर आठवड्याला ‘सो कुल…’ लिहिण्याची संधी मिळाली. काम, लग्न, मातृत्व, चित्रपट, प्रवास आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींसोबत हे लेखनही अखंड सुरू राहिलं. या पुस्तकासाठी दीडशेहून अधिक लेखांमधून काही निवडक लेख घेतले आहेत. त्यांत दहा वर्षांपूर्वीच्या माझ्या संवेदना, समजुती आणि त्या काळाचं जग जसं होतं तसं जपून ठेवलं आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या वाचकांचे, ‘लोकसत्ता’, ‘राजहंस’ आणि विशेषतः माझे स्नेही आल्हाद गोडबोले यांचे मी मनापासून आभार मानते. लोभ असावा… रेडी? रोल, कॅमेरा… सादर करीत आहोत – ‘सो कुल… टेक २’!

Publication Year : 2024

Pages :307

Language : Marathi

Publisher : Rajhans Prakashan

Buy Now On :